अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा आढळरावांना पाठिंबा

ताहेर आसी : जनतेच्या सुख-दु:ख्याची जाणीव असणारा नेता

वानवडी- आपला खासदार कसा असला पाहिजे? स्वच्छ प्रतिमा आणि भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणारा, आम आदमीला भेटण्यासाठी सहजपणे उपलब्ध असलेला. असा केवळ एकच उमेदवार असून तो म्हणजे महायुतीचे उमेदवार तथा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील. त्यामुळे आढळराव पाटील यांना भारतीय अल्पसंख्याक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे, असे संस्थापक अध्यक्ष ताहेर आसी यांनी सांगितले.

भारतीय अल्पसंख्याक संघटनेला अपेक्षित असलेली मूल्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात दिसून येतात. जनतेच्या सुख-दु:ख्याची जाणीव असणारे, दूरदृष्टी ठेवून शहराच्या उन्नतीसाठी काम करणारे, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे असे खासदार आढळराव यांचे व्यक्‍तीमत्व आहे. जाती-धर्माचा विचार न करणारा त्यांच्यासारखा नेताच समाजातील एकात्मता कायम राखेल याचा आम्हाला विश्‍वास आहे. गेल्या 15 वर्षांत खासदार आढळराव पाटील यांनी अनेक मुस्लिम बांधवांना हाज यात्रेला जाण्यासाठी संधी मिळवून दिली. त्याचबरोबर वैद्यकीय उपचारांसाठी, शाळेच्या प्रवेशासाठी मदत केली आहे. दिवस-रात्री कधीही फोन केला तर सहज उपलब्ध होणाऱ्या खासदार आढळराव यांना भेटण्यासाठी गेल्यास त्यांच्याकडून होणारे आदरतिथ्य वाखाणण्याजोगे असते असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे. सोमवरी (दि. 29) धनुष्य बाणासमोरील बटन दाबून खासदार आढळराव पाटील यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन अध्यक्ष आसी आणि पुणे जिल्हाध्यक्ष रेश्‍मा हनीफ पठाण यांनीजा आपल्या समाजबांधवांना केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)