अल्पसंख्यांकासाठीच्या योजनांची गतीने अंमलबजावणी करा : हाजी अराफत शेख 

कोल्हापूर – अल्पसंख्यांक समाजासाठीच्या विविध योजना त्या-त्या लाभार्थीपर्यत प्रभावीपणे पोहचवून त्या योजनांची गतीने अंमलबजावणी करा, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात अल्पसंख्यांक समाजासाठीच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, श्रीधर पाटणकर, संजय शिंदे, सरीता यादव, सतीश माने यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्यांक समाजातील तरूण-तरुणींना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्यासही सर्व यंत्रणांनी सक्रीय व्हावे, असे आवाहन करून अध्यक्ष हाजी अराफत शेख म्हणाले,अल्पसंख्यांक समाजासाठी कौशल्य विकासाच्या दृष्टिनेही प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी अधिकचे रोजगार मेळावे घेण्याबरोबरच तरूणांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यावरही भर द्यावा.

-Ads-

अल्पसंख्यांक समाजातील तरूणांना विविध व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून व्यवसाय, उद्योगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मौलाना आझाद महामंडळाला गती दिली असून शासनाने या महामंडळासाठी 400 कोटीची तरतूद केली आहे, अशी माहिती हाजी अराफत शेख यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)