अल्पसंख्यांकांची हत्या करण्यासाठी पाकिस्तान लष्कराकडून जिहादींचा वापर

वॉशिंग्टन – अल्पसंख्यांकांची हत्या करण्यासाठी पाकिस्तान लष्कराकडून  जिहादी संघटनांचा वापर होत असल्याचा आरोप   वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्ता नदीम नुसरत यांनी केला आहे. गेल्या काही दशकांमध्ये पाकिस्तान लष्करात कट्टरता वाढली असून,लष्कराने जिहादींच्या मदतीने अल्पसंख्यांक आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले घडवून आणले असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. नदीम नुसरत यांच्या या दाव्याने खळबळ उडालीये.

फ्री कराची मोहिमेचे प्रवक्ता नदीम नुसरत यांनी म्हटलं आहे की, ‘भारतासोबत पाकिस्तान लष्कराचे संबंध चांगले राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत भविष्यात भारत आणि पाकिस्तानधील संबंध सुधारले तर लष्कराला आपलं अस्तित्व राखण्यासाठी संघर्ष करावा लागेल’. ‘जर पाकिस्तान लष्कर राजकारणात मध्यस्थी करत राहिला तर दोन्ही देशात कधीच तडजोड होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)