अल्पवयीन युवतीच्या विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा

शिक्रापूर- तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारी अल्पवयीन युवती महाविद्यालय सुटल्यानंतर सणसवाडी रस्त्याने पायी घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकांनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडित युवतीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित दोन युवकांवर विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे. यात भानूदास जानकू पुणेकर (रा. इंगळेनगर, करंजावणे, ता. शिरुर, जि.पुणे) आणि एक अनोळखी युवक याचा समावेश आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीनुसार, पीडित युवती ही तळेगाव ढमढेरे येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. 23 मार्च रोजी युवतीचे महाविद्यालय सुटल्यानंतर ती सणसवाडी रस्त्याने पायी घरी जात होती. यावेळी पाठीमागून (एमएच 12 एलके 0885) या दुचाकीवरुन दोन युवक आले. त्यांनी या युवतीजवळ येऊन तिच्याकडे वाईट भावनेने पाहत “आमचे तुझ्याजवळ काम आहे. तू आमच्या दुचाकीवर बस’, असे म्हटले. यावेळी पीडित युवतीने “मी तुम्हाला ओळखत नाही.’ असे म्हणातच त्या दोघांनी पीडित युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी पीडित मुलीच्या पाठीमागून घराशेजारीला ओळखीचे लोक येत होते. यावेळी पीडित युवतीने हा सर्व प्रकार त्या लोकांना सांगितला. यावेळी त्या लोकांनी दोन युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक युवक पळून गेला. त्यानंतर एकाला पकडून शिक्रापूर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पीडित युवतीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस निरिक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक प्रकाश जगदाळे हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)