अल्पवयीन मुलीशी लिफ्टमध्ये अश्‍लील चाळे करणाऱ्या ज्येष्ठाला सक्तमजुरी

पुणे – लिफ्टमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या ज्येष्ठाला 3 वर्षे सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.के.कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
वसंतकुमार कनकसिंग भाटीया (वय 67, रा. भुसारी उजवी कॉलनी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत 15 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. ही घटना 12 ऑक्‍टोबर 2015 रोजी कोथरूड भागातील एका अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित आणि तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली.
पीडित एकटी आहे, हे पाहून भाटीया लिफ्टमध्ये घुसला. त्याने तिच्याशी अश्‍लील चाळे केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करून कोथरूड पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 8 आणि 12 नुसार दोषी ठरवत न्यायालयाने भाटीया याला शिक्षा सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)