अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या तिच्या आईच्या प्रियकराचा जामीन फेटाळला

आईवरही दाखल आहे गुन्हा

पुणे – बारा वर्षाच्या मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या तिच्या आईच्या प्रियकराचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या आईवरही गुन्हा दाखल आहे. तिचा अटकपूर्व जामीन यापूर्वीच न्यायालयाने फेटाळला आहे.
सचिन अप्पाराव कांबळे (वय 35, वडगावशेरी) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुवेत येथे नोकरी करतात. ही घटना मे 2017 घडली. सचिन आणि त्या मुलीच्या आईचे प्रेमसंबंध आहेत. ती मुलगी घरात टीव्ही पाहत बसली होती. त्यावेळी घराची बेल वाजली. त्यावेळी सचिन आला होता. त्याने आई कुठे आहे, अशी विचारणा तिला केली. त्यावेळी आई बाथरूममध्ये असल्याचे तिने सांगितले. सचिन घरात येऊन तिच्या शेजारी बसला. तिच्याशी अश्‍लील चाळे केले. आईसोबत जे करतो, ते तुझ्यासोबत करायचे आहे, असे तिला म्हटला. याबाबत कोणाला सांगितल्यास तुझे आणि आईचे अश्‍लील फोटो मैत्रिणींना दाखविण्याची धमकी दिली. याबाबत मुलीने आईला सांगितले. त्यावेळी सचिन काहीही करू शकतो, याबाबत वडिलांना सांगू नको, असे आई तिला म्हटली. त्यामुळे गुन्हा घडल्याचे माहित असतानाही पोलिसांपासून माहिती लपविल्याने तिच्या आईवरही बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सचिन याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वैद्यकीय पुराव्यावरून त्याने हा गुन्हा केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अद्याप न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्या मुलीच्या आईचा गुन्ह्यात सहभाग आहे. तिचा अटकपूर्व न्यायालयाने फेटाळला आहे. अटक करण्यासाठी तिचा शोध घेण्यासाठी, जामीन मिळाल्यास तो पीडित, तिच्या वडिलांवर दबाव आणण्याचा आणि पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे, यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने सचिन याचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)