अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या दोन घटना

न्यायालयाने दोघांना सुनावली पोलीस कोठडी

पुणे- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पीडित गरोदर राहिल्याने दोन्ही गुन्हे उघडकीस आले. दरम्यान त्या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.सी.भगुरे यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहिली घटना बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात 28 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीनेच याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू ऊर्फ राजेंद्र प्रकाश काळे (वय 28, रा. सोमवार पेठ, मूळ. शरणपूर, धरमपूर, पोस्ट पडेगाव, ता. जि. औरंगाबाद) याला अटक करण्यात आली आहे. डिसेंबर 2017 मध्ये पीडित मुलगी मालधक्का चौकातील जनसेवा शौचालयात शौचास गेली होती. त्यावेळी जीवे ठार मारण्याची धमकी देत काळे याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो वारवार तिच्यावर बलात्कार करत होता. फिर्यादी चार महिन्याची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलिसांनी काळे याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी वैद्यकीय, पीडित मुलगी गर्भवती असल्याने डीएनए चाचणी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने काळे याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दुसरी घटना बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. या प्रकरणात पोलिसांनी सागर सुभाष गवळी (वय 19, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे. याबाबत पीडित 16 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. सागर याने फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. सन 2016 ते सप्टेंबर 2017 या कालावधीत डोणजे आणि बिबवेवाडी परिसरात तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. फिर्यादी गरोदर राहिल्याने हाही प्रकार उघडकीस आला. दरम्यान सागर याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी वैद्यकीय आणि डीएनए चाचणी करण्यासाठी सागर याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने सागर याला 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)