अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून तरूणाची मुक्तता

पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून तरूणाची सबळ पुराव्या अभावी विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोने यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
इंद्रेश विक्रम गौड (वय 25, रा. गुरूवार पेठ, पुणे, मूळ. उत्तरप्रदेश) असे त्या तरूणाचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. इब्राहिम शेख यांनी काम पाहिले. आवेज खान नावाच्या व्यक्तीने 11 सप्टेंबर 2014 रोजी पीडित मुलीचे अपहरण केले. तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान तिच्या आईने मुलगी हरविल्याची तक्रार पोलिसात दिली होती. घटनेनंतर एक महिन्यानंतर 2 ऑक्‍टोबर 2014 रोजी पीडित लष्कर पोलीस स्टेशनला गेली. तिने खान याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तिला ससुन रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. खानविरोधात गुन्हा दाखल केला. आईन 4 ऑक्‍टोंबर 2014 रोजी विश्‍वासात घेऊन तिची विचारणा केली. खानने रेल्वे स्टेशनला सोडले. तो पळून गेला. त्यावेळी तिने मित्र गौड यास बोलाविले. मी घरी जाणार नाही, तू मला थोडे दिवस कोठे तरी राहण्याची व्यवस्था कर, अशी विनंती केली. त्यावेळी गौड याने तळेगाव येथे नेवून े तिच्यावर बलात्कार केला. तिला मध्यप्रदेश येथे पाठविले. तेथे पंधरा दिवस राहुन पुण्यात येऊन मुलीने याबाबत फिर्याद दिली. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुरूवातील गौड याचे विरोधात तक्रार देण्यात आली नव्हती. तसेच ती मुलगी अल्पवयीन असल्याचे सिध्द होईल, असे कोणताही ठोस पुरावे सरकारी पक्षातर्फे देण्यात आला नाही. डॉक्‍टरानेही वयाची तपासणी केली नाही. त्यामुळे ती अल्पवयीन असल्याचे, तसेच तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचे सिध होत नाही, असा बचाव पक्षाचे वकील इब्राहिम शेख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने गौड याची मुक्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)