अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

लग्नाच्या अमिषाने उत्तरप्रदेशमधून तिला पळून यायला भाग पाडले अन्‌ केला अत्याचार

पुणे – लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीला उत्तरप्रदेश येथून पळून येण्यास भाग पाडले. त्यानंतर संगमवाडी भागात तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरूणाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांनी हा आदेश दिला आहे. रजत जगदीश चौधरी (वय 23, संगमवाडी, मूळ. उत्तरप्रदेश) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीने येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून ते 25 जुलै 2018 या कालावधी घडला. रजत आणि पीडित दोघेही उत्तरप्रदेशचे आहेत. त्याने तिला लग्नाचे अमिष दाखविले. उत्तरप्रदेश येथून मुंबई येथे पळून यायला लावले. तेथून तो तिला येथील संगमवाडी भागात घेऊन आला. दोन महिन्याच्या कालावधीत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत तुझ्या आईला सांग, असे तिने म्हटले. त्यावेळी त्याने तिला मारहाण केली. उत्तरप्रदेश येथील मूळगावी परत सोडण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी रजत याला अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रजत हा मूळचा उत्तरप्रदेशचा आहे. जामीन मिळाल्यास तो फरार होण्याची अथवा पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. पाठक यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)