पुणे-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. विशेष न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी त्याला दि. 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. संदीप आनंदराव देवताळे (वय 40, रा. बिबवेवाडी), असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना दि. 17 नोव्हेंबर 2017 रोजी घडली. पीडित मुलगी ही देवताळे याच्या घरी खेळण्याच्या निमित्ताने गेली होती. त्यावेळी घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत देवताळे याने तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. तसेच त्याने स्वत:जवळचे सिमकार्ड देवून तू माझ्याशी बोलले पाहिजे, अशी ही धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी देवताळे याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, तसेच गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी अतिरिक्‍त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)