पुणे- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोघांना 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोने यांनी हा आदेश दिला आहे.
पहिली घटना विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. याबाबत पीडित 16 वर्षीय मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. शिवाजी राजेंद्र शेळके (वय 24, रा. खांदवेनगर) मूळ. शेगाव दुमाला, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याने 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केला. त्यातून तिने बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेळके याला अटक करून न्यायालयात हजर केले. तसेच त्याने त्या पीडित मुलीला आणि तिच्या बाळाला सोलापूर येथे ठेवले आहे. तपास करून त्या दोघांना पुण्यात आणण्यासाठी, पीडित मुलीचा 164 नुसार अद्याप जबाब नोंदविला नाही. जबाब नोंदविण्यासाठी आणि त्याची सक्षमतेची आणि बाळाची डीएनए चाचणी करण्यासाठी, त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
दुसऱ्या घटनेत तेरा वर्षाच्या नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 29 वर्षीय व्यक्तीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश बळवंत कावळे (वय 29, रा. पिंपळे गुरव) असे त्याचे नाव आहे. ही घटना नोव्हेंबर 2017 ते 10 ऑगस्ट 2018 या कालावधीत घडली. त्याने तिला, तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत तिच्या शाळेच्या शिक्षकांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)