अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे- अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी 20 वर्षीय तरूणाला अटक केली. त्याला 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश पी. सी. भगुरे यांनी दिला आहे. राहुल विलास कांबळे (वय 20, रा. हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत 14 वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना 29 जुलै रोजी घडली. राहूलने त्या मुलीला पळवून नेले. तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी वैद्यकीय तपासणीमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. त्याची सक्षमतेची चाचणी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने राहुलला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)