अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

पुणे – अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून घरात घुसून तिच्यावर बलात्कार करणाऱ्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला आहे.
सुधाकर श्रीरंग माळी (वय 48, रा. गोखलेनगर) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत 14 वर्षीय पीडित मुलीने सांगवी पोलिसांत फिर्याद दिली आहे. जुलै 2017 ते 10 जानेवारी 2018 या कालावधीत फिर्यादीच्या घरात हा प्रकार घडला. माळी त्या मुलीच्या गेला. तिला पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानुसार पीडित मुलगी त्याला पाणी देण्यासाठी गेली. त्यावेळी त्याने तिच्यावर आत्याचार केला. तसेच झाला प्रकार कोणाला सांगितला तर तिला आणि तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. मात्र, पीडितीने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर याबाबत पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी माळी याला अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने माळी याचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)