अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे- लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरूणाला वानवडी पोलिसांनी अटक केली. त्याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्ययाधीश आर. व्ही. अदोने यांनी दिला आहे. सुजनिल नारायण पाटोळे (वय 25, रा. वानवडी) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. 16 वर्षीय पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याने तिला 21 जून रोजी दुपारी 4 च्या सुमारास पळवून नेले. पीडित मुलगी आणि पाटोळे याचे प्रेमसंबंध होते. याबाबत फिर्यादींनाही माहिती होती. दोघांना लग्न करायचे होते. मात्र, पीडित मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे ते दोघे पळून गेले. त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाटोळे याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याची सक्षमतेची चाचणी करण्यासाठी, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला ससून येथे पाठविले आहे. तो तिला राजस्थान, खडकवासला येथे घेऊन गेला होता. यासाठी त्याला कोणी मदत केली आहे का, याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमोद बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)