अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास मदत करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

पुणे- अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास मदत केल्याप्रकरणी दोघांना देहुरोड पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना एक दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
गणेश महादेव एडके (वय 20), शुभम रोहीदास कांबळे (वय 20, दोघेही रा. विठ्ठलवाडी, देहुगांव, ता. हवेली) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी सागर शहाजी कोकणे (वय 21) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणी 17 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी देहुरोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ही घटना 27 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वाजता घडली.
घटनेच्या दिवशी सागर याने पीडित मुलीला रल्वेने कर्जत येथे नेले. त्यानंतर लोकलने अंबरनाथ येथील मावशीच्या घरी नेले. त्यांनतर दोघांनी चार दिवस त्या ठिकाणी मुक्काम केला. दरम्यान घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत सागर याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी गणेश, शुभम या दोघांनी लोणावळ्यापर्यंत दुचाकीवरून संरक्षण दिले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसंनी गणेश, शुभम या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांचा इतर कोणी साथीदार आहे का?, त्यांनी आर्थिक मदत केली आहे का? याचा शोध घेण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकीलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)