अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे – अल्पवयीन मुलीचे अहपरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली. त्याला 30 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला आहे.
अनुप उर्फ चिक्‍या नागनाथ सोनवणे (वय 21, रा. औंधगाव) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. यापूर्वी अंजली नागनाथ सोनवणे (38. रा. औंध गाव) जितेंद्र सुदाम कदम (30, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) आणि शुभम दत्तु गोठे (20, बाटीया शॉपी, औंधगाव) अटक करण्यात आली आहे. याबाबत 16 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. 15 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9.30 वाजता पीडित मुलीचे अनुप उर्फ चिक्‍या सोनवणेने अपहरण केले होते. त्याला इतर तिघांनी मदत केली होती. चिक्‍या पीडीत मुलीला दौंड येथे घेऊन गेला. त्यानंतर त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. त्याच्या घरच्यांकडे तपासणी केल्यानंतरही त्यांनीही त्याच्या बद्दल काहीही सांगितले नाही. पीडित मुलगी आणि चिक्‍या हे शुक्रवारी लोणीकंद पोलीस ठाण्याला हजर झाल्यानंतर याबाबत चतुःश्रृंगी पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. चिक्‍याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले . त्यावेळी त्याला पळून जाण्यास कोणी मदत केली, त्याची वैद्यकीय तपासणी करायची आहे. पीडित मुलीचा जबाब नोंदवायचा असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने चिक्‍क्‍या याला पोलीस देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)