अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरूणास अटक

लग्नाच्या अमिषाने केला बलात्कार
न्यायालयाने त्याला सुनावली 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पुणे, दि. 31 (प्रतिनिधी) – लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरूणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्याला 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी दिला आहे.
स्वागत रामदास हांडे (वय 24, रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे. जून 2017 मध्ये वाघोली येथील पडक्‍या घरात आणि मोकळ्या जागेत ही घटना घडली. फिर्यादी मुलगीही मूळची जुन्नर तालुक्‍यातील आहे. “तुझ्यावर प्रेम आहे. लग्न करणार आहे’ अशी बतावणी करून हांडे याने फिर्यादीवर बलात्कार केला. त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी देत वेळोवेळी शरीर संबंध ठेवण्यास फिर्यादीला भाग पाडले. फिर्यादी गर्भवती राहिली असता हा प्रकार उजेडास आला. फिर्यादीचा ससून रुग्णालयात गर्भपात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हांडे याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी हांडे याची डीएनए चाचणी आणि वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने हांडे याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)