अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 18 वर्षांनी शिक्षा

मुंबई – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने 18 वर्षानंतर शिक्कामोर्तब केले. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी अल्पवयीन मुलीवरील बलात्कारासारख्या घृणास्पद गुन्ह्यात हलगर्जीपणा दाखवला जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त करून आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने ठोठावलेली सात वर्षाची शिक्षा कायम केली. तसेच आरोपीला एका महिन्यात न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश दिले.

पुणे सत्र न्यायालयाने 2002 मध्ये या प्रकरणी 19 वर्षाच्या आरोपीला 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा ठोठावली. त्या विरोधात आरोपीने पीडित मुलीशी तिच्या संमतीने शारिरीक संबंध ठेवल्याचा दावा करत उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. या आव्हान याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकीलांनी आरोपीचा दावा खोडून काढताना मुलीच्या जबाबा हा महत्वाचा दुवा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आरोपीला दोषी ठरवत शिक्षा भोगण्यासाठी एका महिन्यात शरण येण्याचे आदेश आरोपीला दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)