अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एकास अटक

विडणी- गुंगीचे औषध देवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विडणी, ता. फलटण येथील एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मे 2018 मध्ये संशयित दशरथ बबन बनकर वय 40 याने पिडीत मुलीच्या तोंडावर रुमाल टाकून गुंगी आणून लैंगिक अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी पीडित मुलीस दिली. यामुळे मुलीने घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही. परंतु, कालांतराने पीडितेस त्रास होऊ लागल्याने कुटुंबातील लोकांनी 4 जुलैमध्ये खाजगी दवाखान्यात तपासणीसाठी नेले. यावेळी पिडीत मुलगी गर्भवती असल्याचे आढळले. यानंतर पिडीत मुलीने घरातील लोकांना घडलेला प्रकार सांगून संशयीताने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले.

-Ads-

याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात पोक्‍सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संशयित दशरथ बनकर यास अटक करण्यात आली असुन दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक राहूल भोळ करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)