अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कारवाईची मागणी

लोकशाही विचार मंचच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
नगर – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला व त्याला साथ देणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी लोकशाही विचार मंचच्या वतीने करण्यात आली. विचार मंचचे सोमा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन, या प्रश्‍नी चर्चा केली व आरोपींवर कारवाई करण्याचा आग्रह धरला.
तपोवन रोड, समता कॉलनी या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर विवाहित पुरुषाने अत्याचार केल्याची घटना समोर आली. यानंतर पीडित मुलीच्या आईने दि. 11 मे रोजी संबंधित आरोपीवर तोफखाना पोलीस स्टेशनला बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल केला. मात्र, या प्रकरणातील आरोपींना अद्यापि अटक करण्यात आलेली नाही. या घटनेची गांभीर्याने दखल न घेता आरोपींना मोकळीक दिल्याने पोलिसांबाबत संशयास्पद भूमिका स्पष्ट होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या घटनेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वत: लक्ष घालून संबंधित आरोपींना अटक करून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असून, त्याचा तपास करून त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीची भावना निर्माण झाली असून, आरोपी अजूनही मोकाटच आहेत. कथुआ, सूरत येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. अशा घडणाऱ्या घटना गांभीर्याने घेण्याची गरज असून, वेळीच आरोपींवर कारवाई होणे आवश्‍यक असल्याची भावना सोमा शिंदे यांनी व्यक्त केली. या वेळी अनिल मिरपगार, प्रवीण चेमटे, संदीप यादव, गणेश चौधरी, स्वप्निल चव्हाण, राजू अनमल, शैलाताई गायकवाड, आशिष व्यास, विशाल भालेराव आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)