अल्पवयीन मुलीवर अत्याचरप्रकरणी एकावर गुन्हा

आळंदी – लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीसोबत वेळोवेळी शरीर संबध ठेवून, त्यातून झालेल्या गर्भधारणेची माहिती फोनवरून देताच पीडित मुलीसह घरच्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी सोमवरी (दि. 11) एका नराधमावर बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीस अद्याप अटक केली नसल्याचे आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली.
सागर पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी व सागर पाटील यांची तोंड ओळख होती. याचा गैरफायदा घेत पाटीलने तब्बल 14 महिन्यांपासून तिच्यासोबत शाररिक संबध ठेवल्याचा आरोप पीडिताने केला. तसेच त्याच्यापसून गर्भधारणाही झाली. त्यामुळे याची माहिती सागर पाटील यास दिली असता त्याने तिच्यासह घरच्यांना ठार मारण्याची धमकी दिली. अखेर पीडितीने आळंदी पोलीस ठाण्यात सोमवरी पाटील विरोधात तक्रार दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सागर पाटीलचे वय आणि पत्ता पीडितेला सांगता आलेला नाही तो सोलापूर जिल्ह्यातील असल्याची जुजबी माहिती असल्याने अटक करण्यास वेळ लागत असल्याची माहिती माहिती आळंदी पोलिसांनी दिली. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)