अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले

संगमनेर – तालुक्यातील धांदरफळ येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवार दि. २४ एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धांदरफळ याठिकाणी ही अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती.

मंगळवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास अमित लहानु माळी याने या अल्पवयीन मुलीस काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अमित माळी याच्या विरुद्ध गु.रजि.नं. ६४/२०१८ भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बी.बी.घोडे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)