अल्पवयीन मुलीला धमकी देत चार महिने अत्याचार

पीडित मुलीच्या आईची पोलिसांकडे तक्रार

नगर – केडगाव उपनगरातील अल्पवयीन मुलीवर लग्नाचे अमिष दाखवून चार महिने अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईने कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शुभम आप्पा दिघे (रा.केडगाव) याच्याविरोधात बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शुभम दिघे याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलशी शाळेत आणि शिकवणीली येताना-जाताना ओळख काढली. त्यानंतर त्याने मैत्री केली. “मला तू खूप आवडते, मी तुझ्याबरोबर लग्न करीन’, असे सांगून लग्नाचे अमिष दाखविले. यानंतर मुलीचा शुभम याने विश्‍वास संपादन केला. चास येथील लॉजवर नेऊन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला.

पीडित मुलगी या प्रकाराने रडत होती. शुभम याने तिला शिवीगाळ करत दमदाटी केली. मुलीला तिच्याच आईवडिलांना सांगण्याची धमकी दिली. शुभम याने ही धमकी देत मुलीवर चार ते पाच महिने अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. आईने मुलीला विश्‍वासात घेऊन विचारपूस केल्यावर हा प्रकार समोर आला. मुलीच्या आईने यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)