अल्पवयीन मुलीच्या अपहरणचा तपास क्राईम ब्रॅंचकडे

दोन आठवड्यात छडा लावू : पुण्याचे सहआयुक्त रवींद्र कदम यांची न्यायालयात ग्वाही
मुंबई – अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणाचा तपास करण्यात अपयशी ठरलेल्या पुणे पोलिसांनी अखेर हा तपास क्राईम ब्रॅंचकडे वर्ग केला असून पंधरा दिवसांत छाडा लावला जाईल, अशी हमी पुण्याचे सहआयुक्त रवींद्र कदम यांनी आज उच्च न्यायालयात दिली.

दिड महिन्यांपूर्वी मुलीचे अहपरण झाल्याची दाखल केलेल्या तक्रारची पुणे पोलिसांनी योग्य दखल न घेतल्याने मुलीच्या वडिलांच्या वतीने ऍड. रमाकांत पाटील यांनी उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एच. काथावाला आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

न्यायालयाने या अपहरण प्रकरणाची काल गंभीर दखल घेत तपास अधिकाऱ्यांच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त करून पुणे पोलिसांना चांगलेच फटकारले होते. तसेच सहआयुक्त रवींद्र कदम यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होत. अपहरण झालेल्या मुलीसह आरोपीला कोर्टापुढे हजर करा, असा आदेश दिला होता.

पुणे पोलिसांना अपहरण झालेल्या मुलीला आणि अपहरणकर्त्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यास अपयश आले. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार रविंद्र कदम यांनी न्यायालयात हजेरी लावली. या प्रकरणाचा तपास प्रगती पथावर असून तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला असून दोन आठवड्यात छाडा लावला जाईल, अशी हमी न्यायालयाला दिली. तर पुणे पोलिसांना या प्रकरणात तपास करण्यास अपयश आल्याने तपास सीआडीकडे वर्ग करावा, अशी विंनती केली. याची गंभर दखल घेऊन न्यायालयाने 5 जूनपर्यंत तपासाचा प्रगत अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन सुनावणी तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)