अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार करणाऱ्यास सक्तमजुरी

न्यायाधीश ए. एस. राजकारणे यांनी सुनावली शिक्षा
बारामती – अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार करणाऱ्या आरोपीस सात वर्षे सक्तमजुरी तसेच दंडाची शिक्षा येथिल जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजकारणे यांनी सुनावली.

विठ्ठल रामचंद्र हेगडकर (रा. कचरवाडी, ता. इंदापुर, मुळ रा. सांगवी. ता. फलटण) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथिल अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन आरोपी हेगडकर याने हे कृत्य केले होते. पिढीतेच्या वडीलांनी याबाबत इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक आशोक पवार यांनी तपास केला. आरोपी हेगडकर याने पिडीत मुलीशी लग्नाची मागणी केली. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने पिडीतेच्या वडीलांनी त्याला नकार दिला. परंतु, त्यानंतरही चाकूचा धाक दाखवत अपहरण करुन पिडीत मुलीवर सातारा, मुंबई येथे नेवून बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले.

बारामती येथे सुरु असलेल्या या खटल्यात सरकारच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. घडलेली घटना पिडीत मुलीने न्यायालयात विस्तृतपणे सांगीतली. त्यामुळे आरोपी विरोधात असलेला पुरवा व सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरीत न्यायालयाने आरोपी विठ्ठल हेगडकर यास सात वर्षे सक्तमजुरी तसेच 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोलिस नाईक सोमानाथ करचे यांनी खटल्या दरम्यान सरकारी पक्षास मदत केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)