अल्पवयीन मुलीची भर रस्तात छेड काढणाऱ्याला 3 वर्षे सक्तमजुरी

पुणे- भर रस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला 3 वर्षे सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश व्ही.के.कदम यांनी हा आदेश दिला आहे. दंडापैकी 10 हजार रुपये पीडित मुलीला देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
सागर गोरख काकडे (वय 21, रा. वैदवाडी, हडपसर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 14 वर्षीय मुलीने लष्कर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. ही घटना 20 ऑगस्ट 2014 रोजी सकाळी 8.15 च्या सुमारास कॅम्प येथील सोलापूर बाजार येथे घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी काम पाहिले. लष्कर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सपना सोळंके यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी कॉन्स्टेबल योगेश होले यांनी मदत केली. फिर्यादी दोन मैत्रिणीसह हायस्कुलला चालली होती. त्यावेळी काकडे याने भर रस्त्यात हात धरून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 354 (विनयभंग) नुसार 1 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंड, बाललैंग़िक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 7 आणि 8 नुसार 3 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. मात्र, दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात नमुद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)