अल्पवयीन मुलीचा विनयभंग

निगडी – एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना निगडी परिसरात मंगळवारी (दि. 15) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अक्षय बाळासाहेब जगताप (रा. चिंचवड गाव, चिंचवड) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मंगळवारी दुपारच्या वेळी दूध आणण्यासाठी दुकानात गेली होती. दूध घेऊन ती घरी परतत असताना, अक्षय याने तिला अडवले. तिचे कपडे ओढून तिच्याशी छेडछाड केली. माझ्यासोबत लग्न कर असे म्हणत तिला मारहाण देखील केली. याबाबत मुलीने घरी सांगितले असता, मुलीच्या वडिलांनी निगडी पोलिसात गुन्हा दाखल केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)