अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी – शाळेत जाऊन 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्‍लिल वर्तणूक करुन तिचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास काळूस गावच्या हद्दीत घडली.

याप्रकरणी 66 वर्षीय वृद्धाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 25 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 15 वर्षीय नात शाळेत गेली असता दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आरोपी मुलीच्या शाळेत गेला.

-Ads-

दुपारी जेवणाच्या सुट्टीत मुलगी वर्गाबाहेर आली असता आरोपीने तिचा हात पकडत अश्‍लिल वर्तन केले. शाळा सुटल्यानंतर तिच्या मैत्रिणीसोबत घरी जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवून दुपारी झालेल्या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर मुलगी जास्त घाबरली. तिने ही बाब घरी सांगितली. त्यावरुन तिच्या आजोबांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)