अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास अटक

वडगाव मावळ – 17 वर्षीय मुलीला सलग दोन दिवस सतत मोबाईलवर फोन करून अत्यंत अश्‍लिल भाषा बोलून विनयभंग करणाऱ्या आरोपीला वडगाव मावळ पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून एक दिवसात अटक केली. वडगाव मावळ न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत (दि.27) पोलीस कोठडी सुनावली. आरोपी मनमाड नगरपालिकेचा सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.

रमेश गणेश शिकणीस (वय 61, रा. मनमाड, जि. नाशिक) असे कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

-Ads-

पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश शिकणीस याने पीडित 17 वर्षीय मुलीच्या मोबाईलवर फोन केला चुकीचा फोन असल्याचे बोलून मुलीचा आवाज आल्याने आरोपी शिकणीस याने मंगळवारी (दि. 20) आणि बुधवारी (दि. 21) असे दोन दिवस सलग वारंवार फोन करून अत्यंत अश्‍लिल भाषा बोलून विनयभंग केला. बुधवारी रात्री अज्ञात आरोपीच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली.

पोलीस निरीक्षक दगडू हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते यांच्या पथकाने मोबाईल नंबरवरून आरोपीचा माग काढला असता, आरोपी मनमाड नगरपालिकेचा सेवानिवृत्त कर्मचारी आहे. त्याला शुक्रवारी (दि. 23) रोजी सायंकाळी अटक केली. शनिवार (दि. 24) अटक आरोपी रमेश शिकणीस याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी तपासासाठी आरोपीला मंगळवारपर्यंत (दि. 27) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)