अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोघांना पोलीस कोठडी

पुणे- भर रस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणात दोघांना सासवड पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश ए.वाय. थत्ते यांनी दिला.
निखिल रमेश टिळेकर (वय 21), कुणाल राजेंद्र टिळेकर (वय 20, दोघेही, रा. दिवे, ता. पुरंदर) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी आणखी एका तरुणाला न्यायालयात हजर केले होते. मात्र, अल्पवयीन असल्याचा दावा त्याने केला आहे. चौकशी करून आठ ऑगस्ट रोजी त्याबाबत माहिती देण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला आहे. तोपर्यंत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अनिल टिळेकर याच्यावरही गुन्हा दाखल असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. हा प्रकार 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास सासवड येथील म्हाडाच्या सोसायटीच्या समोरील मैदानावर घडला. दुचाकीवर जावून त्यांनी तिचा विनयभंग केला. तिने याबाबत आई, भावास सांगितले. त्यामुळे भाऊ जाब विचारण्यास गेला, त्यावेळी वायर रोप आणि लाथाबुक्‍क्‍यानी त्याला मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले. त्यापैकी एकाने अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. उर्वरित दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली आहे. फरार साथीदाराला अटक करण्यासाठी, त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, याबाबत तपास करण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, वायर रोप जप्त करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी ऍड. बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)