अल्पवयीन मुलीकडून वेश्‍या व्यवसाय करून घेणाऱ्या तिघांचा जामीन फेटाळला

पुणे – बुधवार पेठेत अल्पवयीन मुलींकडून जबरदस्तीने वेश्‍याव्यवसाय करून घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी फेटाळला. लावला.
चंदा मुईमांग तमांग (वय 60), संजिदा रूहूल अमीन मुल्ला (वय 25, दोघेही रा. बुधवार पेठ, मुळ रा. पश्‍चिम बंगाल), कुमार शेलवन तमांग (वय 27, रा. काठमांडू नेपाळ) अशी जामीन अर्ज पेैटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार एन. के. तरटे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 26 जून 2018 व त्यापूर्वी सहा महिन्यांच्या कालावधीत घडली. पोलिसांनी बुधवार पेठेत कारवाई करून आरोपींच्या ताब्यातून कर्नाटक येथील एक आणि बांग्लादेश येथील एक अशा दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली होती. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी जामीन मिळावा म्हणून तिघांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जाला अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. आरोपींना जामीन झाल्यास ते फिर्यादी, साक्षीदारांवर दबाव आणून तपासामध्ये ढवळाढवळ करू शकता. तसेच जामीन मिळाल्यास ते पळून जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळावा, असा ऍड. पाठक यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तिघांचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)