नवी दिल्ली : देशात यापुढे अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांस मरेपर्यंत फाशी देण्यात येणार आहे. याविषयीचा महत्त्वपूर्ण निर्णय केंदीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. 12 वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता सरकार यासाठी अध्यादेश जारी करणार आहे. काश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर केंद्र मंत्रिमंडळाने ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स’ अर्थात पोक्सो कायद्यात सुधारणा करण्यास परवानगी दिली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. “अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी मी आणि माझं मंत्रालय पॉक्सो कायद्यात बदल करणार आहे,” असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री काही दिवसांपूर्वीच म्हणाल्या होत्या.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा