अल्पवयीन मुलावर धारदार हत्याराने वार

पुणे – पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन अल्पवयीन तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथे घडली. याप्रकरणी सात जणांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सतरावर्षीय मुलाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी फिर्यादी त्याच्या दोन मित्रांसह रंगा चौक (आंबेगाव खुर्द) याठिकाणी उभा होता. यावेळी सात जण हातात बांबु आणि कोयता घेऊन फिर्यादी याच्यावर हल्ला केला. याप्रकरणी अधीक तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. यादव करत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)