अल्पवयीन मुलाने चोरलेल्या सहा दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त

गुन्हे शाखेच्या गुंडास्कॉड उत्तर विभागाच्या पोलिसांची करवाई

पुणे – गुन्हे शाखेच्या गुंडास्कॉड उत्तर विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून अल्पवयीन मुलाने चोरलेल्या सहा दुचाकी जप्त केल्या.
सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस शिपाई दत्ता फुलसुंदर यांना पिंपरी येथील शगुन चौक भागात एक अल्पवयीन मुलगा सुझूकी ऍक्‍सेस मोपेड नंबर प्लेट काढून विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पालीस तेथे गेले. त्यावेळी एक मुलगा मोपेड गाडीवरून संशयीतरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने ती गाडी वायसीएम रुग्णालय येथून चोरल्याचे सांगितले. याबरोबरच आणखी पिंपरी, पुणे, कॅम्प आणि शिवाजीनगर परिसरातून पाच दुचाकी चोरल्याचे त्याने कबुल केले. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, गुन्हे शाखा 2 चे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजूम बागवान, सहायक पोलीस फौजदार नरेंद्र सोनवणे, भालचंद्र बोरकर, शितल शिंदे, रमेश भिसे, प्रदीप शेलार, दत्ता फुलसुंदर, अतुल मेंगे, नवनाथ चांदणे अणि कांतिलाल बनसोडे यांनी ही कारवाई केली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)