अल्पवयीन भाचीवर मामाचा अत्याचार

चाकण-घरात अभ्यास करत बसलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन भाचीवर मामानेच अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना चाकण पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडली. याप्रकरणी पिडित 13 वर्षीय मुलीने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, मुलीच्या 39 वर्षीय मामा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. 26 नोव्हेंबर) सकाळी सातच्या सुमारास पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी त्यांच्या घरातील वरच्या मजल्यावरील रुममध्ये अभ्यास करत बसली होती. यावेळी मुलीच्या 39 वर्षीय मामाने तिच्या रुममध्ये प्रवेश करत तिच्यावर अत्याचार केला. आणि घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मुलगी घाबरली असल्याने तिने शनिवारी (दि. 1) तक्रार दाखल केली. याप्रकरणी अद्याप नराधम मामाला अटक करण्यात आलेली नाही. महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)