अल्पवयीन बलात्कार पीडीत मुलीला हायकोर्टाचा दिलासा

मुंबई  – अल्पवयीन बलात्कार पीडीत मुलीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. मुलीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होवू नये म्हणून 24 आठवड्यांच्या गर्भपाताला न्यायालयाने परवानगी दिली आहे. मानखुर्द येथील अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने बलात्कार केला. आरोपीला पॉक्‍सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आले. दरम्यान ही मुलगी गर्भवती राहिली. ती 24 आठवड्यांची होती.

एमटीपी कायद्यानुसार 20 आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही, म्हणून परवानगी मिळावी म्हणून पिडीत मुलीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वैद्यकीय तपासणी अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायालयाने याची दखल घेत पिडीत अल्पवयीन मुलीस गर्भपात करण्याची परवानगी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)