नवी दिल्ली – अल्पवयीन बलात्कार पीडितांना 2 ऑक्‍टोबरपासून भरपाई देण्यात यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. भरपाईची रक्‍कम 4 लाख रुपयांपासून ते 7 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. बलात्कार पीडितांना भरपाई मिळण्याची तरतूद कायद्याने प्रथमच करण्यात आलेली आहे. पोक्‍सो कायद्यात बलात्कारपीडितांसाठी भरपाईची कोणतीही तरतूद नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायायलयाने हा निर्णय दिला आहे.

नॅल्सा (नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी) ने तयार केलेल्या बलात्कारपीडिता सहाय योजनेनुसार अल्पवयीन बलात्कार पीडितेला भरपाई म्हणून रुपये 4 लाख ते रुपये 7 लाख रुपये मिळणार आहेत. सामूहिक बलात्कार प्रकरणात प्राण गमावणाऱ्या पीडितांच्या कुटुंबीयांना रुपये 5 लाख ते 10 लाख भरपाई मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्र सरकार पोक्‍सो कायद्यात सुधारणा करीपर्यंत ही योजना अल्पवयीन बलात्कारपीडितांनाही लागू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)