अल्पवयीन गुन्हेगारांची “कुंडली’ काढणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवडच्या स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालयाचा पदभार हाती घेताच आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी अनेक नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. वाढती बालगुन्हेगारी शहरासाठी चिंतेची बाब बनली आहे. अवघ्या 12 ते 13 वर्षांची मुले वाहन चोरी, सोनसाखळी चोरीमध्ये सहभागी असल्याचे अनेक घटनांवरून पहायला मिळत आहे. बालगुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी आयुक्‍तांनी सराईत अल्पवयीनांची कुंडली काढण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

आळंदी येथे तीन अल्पवयीन मुलांनी एका व्यवसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून 65 हजार रुपयांना लुटले होते. खंडणी व दरोडा विरोधी पथकाने सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले. तर अक्‍या बॉन्ड असे नाव धारण केलेल्या 17 वर्षीय मुलाने परिसरात दहशत पसरवत पोलिसांना नाकीनऊ आणले आहेत. निगडी पोलिसांनी नुकतेच 7 अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी शहर व परिसरातून सुमारे 4 लाख रुपये किमतीच्या 56 सायकल चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोनसाखळी, दुचाकी चोरी, वाहनांची तोडफोड अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे अल्पवयीन सराईतांकडेही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार आता ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, जे परिसरात भाईगिरी करतात तसेच सोशल मीडियावरही दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात अशा सर्व विधीसंघर्षीत बालकांची कुंडली पोलीस काढणार आहेत. ते कुठे राहतात, ते काय करतात, त्यांचा दिनक्रम, त्यांची पार्श्‍वभूमी अशा अनेक बाबी त्यांच्या कुंडलीत मांडल्या जातील. जेणेकरून संबंधित अल्पवयीन काही गंभीर गुन्हा करण्याआधीच त्याच्यावर रोख लावणे पोलिसांना शक्‍य होईल.

गुन्हा घडण्याआधीच त्याच्यावर प्रतिबंध केला तर पुढील गुन्हा वेळीच टाळता येतो. सध्या अल्पवयीन मुलांना दादा, भाई बनून परिसरात दहशत पसरवायची असते. त्यामुळे ते नकळत का असेना गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी आधीच त्यांची माहिती काढण्यात येणार आहे.
– आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)