अल्पवयीनांमधील वाढती व्यसनाधीनता(भाग दोन )

आजच्या या धकाधकीच्या व विज्ञानक्षम काळात अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढताना दिसून येत आहे. व्यसनाधीनता म्हणजे एखाद्या पदार्थाच्या अथवा गोष्टीच्या आत्यंतिक आहारी जाणे होय. आजच्या काळामध्ये जग हे अधिकाधिक प्रगतमय होत चालले आहे; परंतु त्याचबरोबर व्यक्तींमधील सहनशक्ती, आत्मशक्ती या सर्व गोष्टींचा ऱ्हास होताना दिसून येत आहे.

    मृणाल घोळे – मापुस्कर

    पालकांनो ही काळजी घ्या… 

वयात आलेल्या मुलांच्या कुटुंबीयांनी काही गोष्टी काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. प्रथमतः आपला पाल्य कोणत्या मुलांच्या संगतीत वावरतो, हे वारंवार पालकांनी तपासत राहणे गरजेचे आहे. तसेच जर आपला पाल्य कधी मद्यपान करून घरी आला व ते आपल्या लक्षात आले, तर त्याला न मारता न ओरडता मद्यपान किंवा कोणतेही व्यसन करणे हे भावी आयुष्यात धोक्‍याचे ठरू शकते, हे त्यास समजून सांगावे. त्याचप्रमाणे पालकांनी आपल्या पाल्याबरोबर मित्रत्वाचे नाते प्रस्थापित करावे; परंतु गरज भासल्यास थोडे कठोरही व्हावे. तसेच आपला पाल्य हा व्यसनाधीनतेकडे वळत असल्यास व पालकांच्या समजावून सांगण्याचा मुलांवर काहीच परिणाम होत नसल्यास अशा वेळी जास्त वेळ न घालविता त्याला झीूलहेश्रेसळीीं कडे घेऊन जाणे गरजेचे असते.

     सारे काही लपून-छपूनच…

तरुणाईच्या सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच तरुण-तरुणी वेगवेगळया व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात. विडी ओढणाऱ्यांपासून महागडी सिगारेट ओढणारे युवक आज सर्वत्रच आढळतात. म्हणजेच या व्यसनांची किंमत खालपासून वरपर्यंत वाढत जाते. देशी दारू पिणाऱ्यांपासून ते उंची विदेशी मद्य पिणाऱ्यांपर्यंत ही व्यसनी मंडळी दिसून येतात. गुटखा खाणारे मृत्यूला कसे जवळ जात आहेत, हे काही त्या व्यक्तीला समजत नसते असे नाही, पण तरीही केवळ गुटख्याच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने, ती व्यक्ती गुटखा सोडायचा प्रयत्न करीत नाही, असे बऱ्याचदा दिसते.

आज शासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही अनेक पान-टपऱ्यांवर गुटखा अनधिकृतपणे विकला जातो. नेहमी गुटखा विकत घेणारी व्यक्ती त्या टपरीवर आल्यानंतरच तो लपवलेला गुटखा त्या व्यक्तीला दिला जातो. ही गोष्ट आज जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे, पण लपून होत असलेल्या या गुटखा विक्रीवर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. फरक फक्त एवढाच दिसतो की मध्यमवर्गीय वेगळी व्यसने करताना दिसतात. तर उच्चवर्गीय वेगळी व्यसने करताना आढळतात. सिगारेटपासून सुरू झालेले व्यसन हळूहळू दारू, जुगार आणि अशाप्रकारच्या महाभयंकर व्यसनात रूपांतरीत होते. जगात अशी कोणतीच गोष्ट नाही, जी आपण मनापासून ठरवल्यानंतर करू शकत नाही. फक्त आवश्‍यकता असते ती इच्छाशक्तीची.

(लेखिका क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत)

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)