अल्पबचतीवरील व्याजदरात वाढ

नवी दिल्ली – बऱ्याच वर्षांनंतर सरकारने अल्पबचतींवरील व्याजदरात वाढ केली आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि भविष्यनिर्वाह निधीच्या व्याजामध्येही सरकारने ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी 0.4 टक्के वाढ केली आहे. बॅंकांमधील ठेवींवरील व्याजदरात आता वाढ होणार आहे. नागरिकांकडून केली जाणाऱ्या अल्पबचतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक, मुलींचे पालक यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दर तीन महिन्यांनी या व्याज दरांचा आढावा घेतला जात असतो, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे. अल्पबचत करणाऱ्यांना मदत व्हावी यासाठी या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये या अल्पबचत ठेवींवरील व्याजदर 0.3 ते 0.4 टक्‍क्‍यांनी वाढवण्यात आला आहे, असे जेटली यांनी म्हटले आहे. मुलींच्या कल्याणा प्रोत्साहन आणि ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षितता याकडे सरकार लक्ष देणार आहे, असेही जेटली यांनी म्हटले आहे.

1 ऑक्‍टोबरपासून सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज दर 8.1 टक्‍क्‍यावरून 8.5 टक्के करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेवरील व्याजदर 8.3 टक्‍क्‍यांवरून 8.7 टक्के करण्यात आला आहे.

1 एप्रिल 2012 पासून बहुतेक सर्वच अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये घट झाली होती. अर्थमंत्रालयाच्या आजच्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)वरील व्याजदर 7.6 टक्‍क्‍यांवरून वाढून 8 टक्के करण्यात आला आहे. एप्रिल 2012 मध्ये हाच व्याजदर 8.8 टक्के इतका होता. मात्र त्यानंतर त्यात सातत्याने घट झाली. किसान विकास पत्रांवरील व्याजदर 7.3 टक्‍क्‍यांवरून वाढून 7.7 टक्के झाला आहे. यामुळे किसान विकास पत्रे 118 महिन्यांऐवजी 112 महिन्यातच “मॅच्युअर’ होतील.

पाच वर्षांची मुदत ठेव, चालू ठेव योजना, ज्येष्ठ नागरिक बचत ठेव योजनांवरील व्याजदर अनुक्रमे 7.8, 7.3 आणि 8.7 टक्के इतका करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत ठेवींवरील व्याज तीन महिन्यांनी जमा होते. तर बचत ठेव योजनांवरील वार्षिक 4 टक्के व्याज कायम ठेवण्यात आले आहे.

सुकन्या समृद्धी खात्यावर आतापेक्षा 0.4 टक्के जास्त म्हणजे 8.5 टक्के इतके सर्वाधिक व्याज मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)