अलोक वर्मा प्रामाणिक अधिकारी; त्यांचे कार्यही चांगले : सुब्रमण्यन्‌ स्वामी

मोदींवर पूर्ण विश्‍वास; पण… 
अहमदाबाद: रोखठोक आणि परखड भूमिकेसाठी ओळखले जाणारे भाजपचे खासदार सुब्रमण्यन्‌ स्वामी यांनी सीबीआयमधील अंतर्गत संघर्षावरून निर्माण झालेल्या वादात उडी घेतली आहे. सीबीआयचे संचालक अलोक वर्मा हे प्रामाणिक अधिकारी आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांचे कार्यही चांगले आहे, असे स्वामींनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्मा यांच्यावरील कारवाईचा फेरविचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
वर्मा प्रामाणिक आहेत. तर सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना भ्रष्ट अधिकारी आहेत, असा आरोप स्वामी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. अस्थाना यांच्यावरील आरोपाला पुष्टी देणारा पुरावा आहे का, असे पत्रकारांनी विचारल्यावर ते उत्तरले, योग्य पुरावा असल्याशिवाय मी कधीच बोलत नाही. माझा पंतप्रधान मोदींवर पूर्ण विश्‍वास आहे. पण, त्यांच्या भोवती असणारे काही जण खुद्द मोदींच्याच आणि भाजपच्या हितांना बाधा पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खळबळजनक आरोपही स्वामी यांनी केला.
वर्मा यांच्यासाठी आज कॉंग्रेसची निदर्शने 
वर्मा यांच्या पाठिशी उभे राहत कॉंग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. देशाची प्रमुख तपास संस्था असणाऱ्या सीबीआयची प्रतिमा उद्धवस्त करत असल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी माफी मागावी आणि वर्मा यांची फेरनियुक्ती केली जावी, अशा मागण्या कॉंग्रेसने केल्या आहेत. या मागण्या मांडण्यासाठी पक्ष उद्या (शुक्रवार) सीबीआयच्या देशभरातील सर्व कार्यालयांबाहेर निदर्शने करणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)