अली जाफरने पाठवली मिशा शफीला नोटीस

बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या वेगवेगवळ्या घटना रोज नव्याने उघड होत आहेत. एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये “कास्टिंग काऊच’ नावाने ही कुप्रथा ओळखली जायला लागली आहे. पाकिस्तानी गायक आणि संगीत दिग्दर्शक अली जाफरवरही काही दिवसांपूर्वी पार्श्‍वगायिका मिशा शफीने असाच आरोप करून खळबळ उडवून दिली होती. मात्र यावरून अली जाफरने आता मीशाला कायदेशीर नोटीस पठवली आहे आणि तिने केलेल्या आरोपांबद्दल बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली आहे.

जर माफी मागितली नाही, तर मीशाला 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या खटल्याला सामोरे जावे लागण्याचा इशाराही या नोटीसीमध्ये दिला आहे. मिशाने सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून अलीवर आरोप केले होते. हे आरोप मिशाने डिलीट करावेत, अशी मागणीही अलीने केली आहे.

दुसरीकडे मिशा शफीने मात्र कोणतीही तडजोड न करण्याचा पवित्रा घेतला आहे. तिने अलीच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याची पूर्ण तयारी केली आहे. तिने आपल्या वतीने केस ल्ढण्यासाठी दोन मातब्बर वकिलांची नियुक्‍ती केली आहे. याशिवाय या प्रकरणामध्ये मीडियाला जर काही माहिती हवी असेल, तर ती माहिती पुरवण्यास आपण तयार असल्याचेही तिने म्हटले आहे.

दरम्यान अली जाफरवर लैंगिक शोषणाचे आरोप केवळ एकट्या मिशा शफीनेच केलेले नाहीत. त्याच्यावर आणखीही काही गायिका आणि उगवत्या अभिनेत्रींनी हे असेच आरोप केले आहेत. त्यामुळे त्याच्यासमोरील अडचणी आणखीन वाढल्या आहेत. अलीने आपल्या चुलत बहिणीला कीस करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पाकिस्तानी पत्रकार मोहम जावेदनेही केला आहे.

एकदा सेल्फी घेत असताना अलीने आपल्याला असभ्यपणे हात लावल्याचा आरोप मेक अप आर्टिस्ट लीना घनीने केला आहे. पाकिस्तानी ऍक्‍ट्रेस माहिरा खानने या सर्व महिलांची बाजू घेतली आहे आणि अली जाफरवर एन्टरटेनमेंट विश्‍वात बहिष्कार टाकला जाण्याची मागणी केली आहे. आता पाकिस्तानात अली जाफरविरोधात सोशल मीडियातून जोरदार टीका व्हायला लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)