अलीबाबा सीएसआरचे काम करणार

नवी दिल्ली -आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिनावेळी अलीबाबाने यूसी वेबसह फिलोन्थ्रपी परिषदेचे आयोजन केले. या परिषदेत शिक्षण, बाल संरक्षण आणि महिला सशक्तीकरण या विषयावर व्यापक चर्चा झाली. तसेच या परिषदेत भारतात अलीबाबा ग्रुपच्या मिशन मिलियन बुक्‍स याद्वारे वर्ष अखेरीस लाख पुस्तकांचे गरीब मुलांना वितरण हे लक्ष्य पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यूसी चॅरिटी न्यूज चॅनल द्वारा भारताच्या 10 भारत धर्मादाय संस्थांसह जनजागृती करण्यासाठी भागीदारी करण्याची घोषणा केली गेली. शिवाय महिला सक्षमीकरणाच्या मोहिमेसाठी अभिनेत्री कंगना राणावतशी भागीदारीची घोषणा करण्यात आली.

अलीबाबा डिजिटल मीडिया ऍण्ड एंटरटेनमेंट ग्रुपच्या, अध्यक्ष, शुनया नझू या प्रसंगी म्हणाले की, अलीबाबासाठी सामाजिक दायित्व महत्त्वाचे आहे आणि ते कंपनीच्या मुख्य धोरणामध्ये समाविष्ट आहे. सामाजिक दायित्वसाठी कोणतेही सीमा नसते. म्हणूनच ही फिलोन्थ्रपी परिषद प्रथमच चीनच्या बाहेर भारतात आयोजित करण्यात आली आहे. शिवाय हे अलीबाबासाठी भारताचे महत्त्व ही अधोरेखित करते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)