अलीगड प्रकरणाचा राष्ट्रवादी युवतींकडून निषेध

नारायणगाव- अलीगड जिल्ह्यातील अखिल भारतीय हिंदू महासभेने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी महात्मा गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घालून केलेल्या निंदनीय प्रकाराचा पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस वतीने
निदर्शने करून दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक दुःखद आणि लाजिरवाणी घटना 30 जानेवारी 2019 ला उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यामध्ये घडली. या जिल्ह्यातील अखिल भारतीय हिंदू महासभेने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी महात्मा गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घालून गांधी हत्येची निंदनीय घटना पुन्हा एकदा घडवली. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली व दोषी व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर व पुणे जिल्हा अध्यक्षा पूजा बुट्टे पाटील यांनी पुणे जिल्हा अधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे दिले, तसेच पुणे पोलीस आयुक्तांकडेही दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अश्विनी खाडे, रेश्‍मा जोरी, नीलाक्षी खिरीड, मोनिका झुरंगे, माधुरी सांगळे, अक्षता पवार आदी उपस्थित होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)