अलिबागच्या किनाऱ्यावरील बेकायदा बंगल्यांना अभय का?

हायकोर्टाचा संतप्त सवाल 

मुंबई – अलिबागच्या किनाऱ्यालगत बॉलिवूडमधील सिनेस्टार तसेच मुंबईतील बड्या व्यापाऱ्यांनी बांधलेल्या बेकायदा बंगल्यांबाबत उच्च न्यायालयाने सरकारची खरडपट्टी काढली. या बंगल्यांना अभय का दिले जाते ?असा सवाल उच्च न्यायालयाने केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अलिबाग किनाऱ्यावरील अनधिकृत बंगल्यांविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी न्या.अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर आज झाली. गेल्या अनेक वर्षापासुन सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन बांधण्यात आलेल्या या बंगल्यांकडे रायगड जिल्हाधिकारी कानडोळा का करतात. त्यांच्या विरोधात कारवाई का केली जात नाही अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली आणि चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

अलिबागच्या किनारपट्टीच्या वर्सोली, सासवणे, कोलगाव, डोकवडे या गावांमध्ये फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्यासह बॉलिवूडमधील सिनेस्टार, मोठया व्यापाऱ्यांनी जमीन खरेदी केली आहे. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन हे बंगले उभारले. या परिसरात सुमारे 175 बंगले बेकायदा उभारलेले आहेत. शेतीसाठी खरेदी केलेल्या या जमिनीवर हे बंगले उभारण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)