अलिगड मुस्लिम विद्यापीठात दहशवाद्यांसाठी प्रार्थना सभा

अलिगड (उत्तर प्रदेश) – उत्तर काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीमध्ये ठार झालेला हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी मनन बशीर वाणी याच्यासाठी प्रार्थनासभा आयोजित केल्याबद्दल अलिगड मुस्लिम विद्यापीठातील तीन काश्‍मीरी विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

विद्यापीठातील काही काश्‍मिरी विद्यार्थी गुरुवारी केनेडी सभागृहामध्ये प्रार्थनासभेसाठी जमा झाले होते. ही प्रार्थनासभा मयत दहशतवादी मनन बशीर वाणीसाठी असल्याचे समजल्यावर विद्यापीठाचे पदाधिकारी आणि अन्य विद्यार्थी संघटनांचे विद्यार्थीही तेथे जमा झाले आणि त्यांनी ही प्रार्थना सभा थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काश्‍मिरी विद्यार्थी आणि अन्य विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सरतेशेवटी काश्‍मिरी विद्यार्थ्यांनी तेथून काढता पाय घेतला, असे विद्यापीठाचे प्रवक्‍ते प्रा. शफी किडवाणी यांनी सांगितले.

मात्र या प्रकाराची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली असून अशा देशविघातक कारवाया सहन केल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी स्वागतार्ह असले तरी दहशतवाद्यांचे समर्थन केले जाऊ शकणार नाही, असे विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष फैजुल हसन याने म्हटले आहे. भाजपचे आमदार सतिश गौतम यांनीही संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

अलिगड विद्यापीठातून पी.एचडी करणारा मनन बशीर वाणी यावर्षी जानेवारीमध्ये दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. हिंदवाडातील शातगुंड येथे गुरुवारी झालेल्या चकमकीत तो मारला गेला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)