अलाहाबाद, आयडीबीआय बॅंकेच्या तोट्यात झाली वाढ 

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील अलाहाबाद बॅंक आणि आयडीबीआय बॅंक यांनी जून तिमाहीचा निकाल जारी केला असून तोट्यामध्ये वाढ झाली. अलाहाबाद बॅंकेचा निव्वळ तोटा 1,944 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षात समान कालावधीत 28 कोटी रुपयांचा नफा झाला होता. गेल्या वर्षीच्या 4,968 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत 4,794 कोटी रुपयांवर पोहोचले. व्याजातून मिळणार उत्पन्न वाढले असून 4,599 कोटी रुपयांवर पोहोचले. एकूण कर्जाच्या तुलनेत एनपीए 15.97 टक्के आहे.
आयडीबीआय बॅंकेचा तोटा 2,409 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी समान कालावधीत तो 853 कोटी रुपये होता. बुडीत कर्जाच्या तरतुदीत दुप्पट वाढ केली असून ती 5,239 कोटींवर पोहोचली. बॅंकेचे उत्पन्न घटले असून ते 6,402 कोटी रुपयांवर गेले. आगामी काळात तरतूद कमी करावी लागेल व नफा वाढेल, अशी आशा बॅंकेने व्यक्‍त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)