अलायन्स क्‍लबतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर

दिघी :अलायन्स क्‍लबतर्फे आयोजित शिबिरात तपासणी करुन घेताना नागरीक.

दिघी – अलायन्स क्‍लब ऑफ पिंपरी चिंचवड, अलायन्स क्‍लब ऑफ पुणे व संकल्प सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्‍त विद्यमाने आदर्शनगर दिघी येथे मोफत नेत्र चिकित्सा, रक्‍तदाब, मधुमेह व त्वचारोग तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबिरामध्ये एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय येथील नेत्रतज्ञांद्वारे पाचशे नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली.

रुग्णांना मोफत चष्मे व औषधे देण्यात आली. मोतीबिंदु असलेल्या तीन रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया मंहमदवाडी येथील एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालयात करण्यात आली. शिबिरामध्ये 375 लोकांची मधुमेह तपासणी व 300 लोकांची त्वचारोग तपासणी करुन आवश्‍यकतेनुसार औषधे देण्यात आली. या शिबिरात मंजुरीबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, आदर्शनगर, दिघी शाळेतील शिक्षक व परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

यावेळी अलाय रमेश पाबळकर, प्रकाश शहापुरकर, नंदलाल खटन, रामेश्‍वर बोंगाळे, संताजीराव मोहिते, आण्णा मटाले, कैलास भांगरे, सुरेश कोटगीरे, श्रीधर गळवे, सुनील अग्रवाल, तेजेंदर खनुजा, रुपचंद सोनी, किरण कोठारी, हसमुख साखरिया व सभासद उपस्थित होते. तसेच संकल्प सामाजिक प्रतिष्ठानचे समाधान कांबळे, विकास काळे, आनंद काशिद, दिलीप पाटोळे, शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत रहाणे व शिक्षक वर्गाने शिबीर आयोजित करण्यात आणि व्यवस्थापनात मदत केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)