अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी रणवीरचे ‘यांनी’ केले कौतुक

मुंबई : ‘पद्मावत’ या सिनेमातील अभिनेता रणवीर सिंह याच्या अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेचे सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे. आता त्याच्या या भूमिकेचे कौतुक करणारे अमिताभ बच्चन यांचे त्याला मिळाले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून पत्र आल्याने रणवीर सध्या चांगलाच खुश आहे. त्याचा हा आनंद त्याने ट्विटरच्या माध्यमातून समोर आणला आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडून मिळालेलं पत्र त्याने ट्विटरवर शेअर केले आहे. त्याने त्याने लिहिले ली, ‘मुझे मेरा अवॉर्ड मिल गया’.
रणवीर सिंह हा अमिताभ बच्चन यांचा किती मोठा फॅन आहे हे त्याने वेळोवेळी सांगितले आहे. अमिताभ बच्चन हे कलाकारांच्या भूमिकांचं कौतुक करण्यासाठी त्यांना पत्र लिहितात. याआधी अमिताभ बच्चन यांनी कंगना राणावत हिला ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘क्वीन’ मधील काम आवडल्याने पत्र लिहिलं होतं. तसेच सुशांत सिंह राजपूत याला ‘एमएस धोनी’ सिनेमातील कामासाठी पत्र लिहिले होते तर दीपिकाला तिच्या ‘रामलीला’ सिनेमातील कामासाठी पत्र लिहिले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)