अलविदा कूक

इंग्लंडचा विक्रमी फलंदाज अलिस्टर कूक याला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्या चार सामन्यात आपल्या प्रतिभेला न्याय देता आला नाही. त्यानंतर त्याने पाचव्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होण्याची घोषणा केली. त्याच्या या घोषणेने सर्वांचे लक्ष शेवटच्या कसोटी सामन्यावर लागले.

या डावखुऱ्या शैलीदार फलंदाजाचा कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी खेळताना सर्वाधिक धावा बनविण्याचा विक्रम आहे. कूक आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट गोड करणार की अन्य काही महान फलंदाजांप्रमाणे ओव्हलचे मैदान त्याच्या पदरी निराशा देणार याचे वेध क्रिकेटप्रेमींना लागले होते. सर डॉन ब्रॅडमन यांनी याच मैदानावर आपल्या कारकिर्दीचा शेवटच्या सामन्यात भोपळादेखील फोडता आला नव्हता. त्यामुळे त्यांची सरासरी अशी राहिली. आपली सरासरी करण्यासाठी त्यांना शेवटच्या डावात फक्त धावा करायच्या होत्या. पण त्यात ते अपयशी ठरले.

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीचा कसोटी सामन्याची देखील आठवण यामुळे जागी झाली. इंग्लंडच्या चाहत्यांनी देखील त्यांच्या हा फलंदाज मैदानावर आल्यावर मोठ्या जल्लोषात त्याचे स्वागत केले. पहिल्या डावात भारतीय संघाने कुकला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. जेव्हा कूक मिडल स्टंपसाठी गार्ड घेत पंचना ‘मिडल प्लिज’ असा म्हणाला असेल. तेव्हा पंचांना देखील त्याचा आवाज ऐकू गेला नसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंग्लंडचे पाठीराखे त्याचे जल्लोषात स्वागत करत होते.

पहिल्या डावात कूकने धावांची खेळी केली होती आणि दुसऱ्या डावात तर त्याने धावांची शतकी केली. अशी खेळी करत आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करून निरोप घेणारा तो फक्त पाचवा फलंदाज ठरला. त्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटीमध्ये भारताविरुद्ध शतकी खेळी करून जबरदस्त पदार्पण केले होते आणि शेवटच्या कसोटीमध्ये भारताविरुद्धच शतकी खेळी करून त्याने आपल्या कारकिर्दीचा शेवट गोड केला.

– राजकुमार ढगे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)